माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. हा अर्थसंकल्प पाशवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक अर्थसंकल्प असल्याचं ते आज झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
सरकार स्थापनेवेळी १०० दिवसांचा आराखडा मांडण्यात आला होता. त्या आराखड्यापैकी एकही गोष्ट या अर्थसंकल्पात आली नसल्याची टीका ठाकरे यांनी केली.