डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व समाजाच्या नेत्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी

आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सर्व समाजाच्या नेत्यांना बोलावून चर्चा करावी आणि सर्वमान्य तोडगा काढावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. आरक्षणाचा प्रश्न लोकसभेतच सुटू शकतो, हे अधिकार राज्यांना नाहीत, असं ते म्हणाले. केंद्र सरकार आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भात तोडगा काढत असेल तर आमच्या पक्षाचा पाठिंबा असेल, असं त्यांनी सांगितलं. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे, असं ते म्हणाले.

धारावीतल्या रहिवाशांना धारावीतच घर मिळायला हवं अशी आमची मागणी असून धारावीवासियांना बेघर होऊ देणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. राज्य सरकारनं पशुसंवर्धन खात्याचा भूखंड मुंबै बँकेला दिला असून महाविकास आघाडीचं सरकार आलं तर हा निर्णय रद्द करु, असं ते म्हणाले.

त्यापूर्वी आज मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या आंदोलकांनी उद्धव ठाकरे ह्यांची भेट घेऊन निवेदन दिलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा