विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन हे एकतर्फी असून हा लोकशाहीविरोधी निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. सभागृहात एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करणं, दोन्ही बाजू मांडू देणं आवश्यक असतं. मात्र दानवेंना बाजू मांडायला वेळ दिली गेली नाही, असं ठाकरे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. विधानपरिषद निवडणुकीतला आपला विजय झाकोळून टाकण्यासाठी हा निर्णय घेतला असून षडयंत्र रचून दानवे यांना निलंबित केल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला.
Site Admin | July 2, 2024 7:19 PM | अंबादास दानवे | उद्धव ठाकरे | विधानपरिषद