डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबईतल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाची निविदा रद्द करण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी

मुंबईतल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाची अदानी समूहाला दिलेली निविदा रद्द करून पुन्हा पारदर्शक पद्धतीनं निविदा काढावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.

 

धारावीकरांना त्यांच्या हक्काचं ५०० चौरस फुटांचं हक्काचं घर तिथेच मिळायला पाहिजे, ही आपल्या पक्षाची भूमिका असल्याचं ते म्हणाले. अदानी समूहाला वारेमाप एफएसआय दिला जात असून समूहाला दिलेल्या निविदेत वाढीव एफएसआयचा उल्लेख नाही. धारावीकरांना धारावीतून हाकलून लावण्याचा, नागरी संतुलन बिघडवण्याचा हा डाव असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

 

काँग्रेसनंही यासंदर्भात राज्य सरकारवर टीका केली आहे. मुंबईतल्या सर्व जमिनींचे अधिकारच अदानी समूहाला देण्याचा भाजपा सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. राज्य सरकारची भूमिका गुजरातधार्जिणी असून याबाबत राज्यातल्या जनतेमध्ये रोष असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

 

मुंबईसह महाराष्ट्र गुजरातला विकण्याचा भाजपाचा डाव काँग्रेस कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा