बांग्लादेशात अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या अत्याचाराविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई इथं झालेल्या एका पत्रकार परिषदेत केली. या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी प्रधानमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती, पण त्याबाबत होकार न मिळाल्यामुळं हा विषय पत्रकार परिषदेत मांडला असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
Site Admin | December 13, 2024 3:29 PM | Bangladesh | Uddhav Thackeray
बांग्लादेशात अल्पसंख्याकांच्या अत्याचाराविषयी प्रधानमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी – उद्धव ठाकरे
