छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना महायुती सरकारनं भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाणा इथं केला. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्या प्रचारसभेला ते संबोधित करत होते. महाविकास आघाडीनं गेल्या काही काळात विकासकामं केली. पीकविमा, सोयाबीनला भाव, शेतकऱ्यांना कर्जमाफी, कोरोना काळात औषधं अशी कामं आपल्या सरकारनं केल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
Site Admin | November 8, 2024 7:03 PM | Uddhav Thackeray
शिवरायांचा पुतळा उभारताना महायुतीनं भ्रष्टाचार केल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
