डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षणाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. यासंदर्भात बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी कौतुक केलं. 

न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसी आरक्षणात वर्गवारी करण्याची सूचना दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. घटनाबाह्य स्वरूपाचं सरसकट आरक्षण देणं अयोग्य आहे, शाहू महाराजांच्या काळात सुरू झालेल्या आरक्षण प्रणालीचा पुनर्विचार करण्याची गरज आहे, असं मत व्यक्त केलं. फडनवीस सरकारच्या कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, पण महाविकास आघाडीला ते टिकवता आलं नाही, अशी टीका त्यांनी केली.  आर्थिक मागास प्रवर्गाला 10 टक्के एससीबीसी आरक्षण दिलं. ज्यांना जातीय आरक्षण आहे, त्यांना एससीबीसी आरक्षण दिलं जात नाही. आर्थिक मागास आरक्षण गेल्यानं मराठा समाजानं स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली, असं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा