राज्यातला शेतकरी शेतमालाला हमीभाव मागत आहे, मात्र भाजपाचे नेते इतर मुद्यांवर बोलून दिशाभूल करत आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगोला इथल्या प्रचारसभेत केली. काश्मीरमधलं ३७० कलम हटवलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सांगतात मात्र काश्मीरमधले दहशतवादी हल्ले अजूनही थांबले नाहीत, भाजपाच्या नेत्यांना देशाच्या सुरक्षेपेक्षा राज्यातल्या निवडणुका जास्त महत्वाच्या वाटतात असं ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर पुढची पाच वर्षं जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू असं आश्वासन त्यांनी दिलं.
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी मतदारसंघातही उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभेला संबोधित केलं. भाजपा सरकारनं महाराष्ट्राची फसवणूक केली असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.