डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढणार

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  पक्ष स्वबळावर लढणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. नागपुरात ते वार्ताहरांशी बोलत होते. नागपूरपासून मुंबईपर्यंत आपला पक्ष स्वबळावर लढत आहे, कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो, असं राऊत म्हणाले. 

 

खासदार अरविंद सावंत यांनीही राऊत यांच्या म्हणण्याला दुजोरा देत स्वबळावर लढण्याची गरज व्यक्त केली. पक्षाने एकट्याने विधानसभा निवडणूक लढवली असती तर यापेक्षा जास्त आमदार निवडून आले असते असं सावंत म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा