स्पेनच्या पोंटेवेद्रा इथं झालेल्या २० वर्षांखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेच्या क्रमवारीत भारताच्या महिला कुस्तीपटूंनी फ्रीस्टाइल प्रकारात दुसरं स्थान पटकावलं. त्यांनी १ सुवर्ण, १ रौप्य आणि ३ कास्य अशी एकंदर ५ पदकं जिंकली. ६२ किलो वजनी गटात नितिका हिला काल रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं, तर ५७ किलो वजनी गटात नेहा हिनं हंगरीच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून कास्यपदकावर नाव कोरलं. तत्पूर्वी, ७६ किलो वजनी गटात ज्योती बेरवाल हिनं सुवर्णपदकाला गवसणी घातली होती, तर कोमल हिनं ५९ किलो वजनी गटात, तर सृष्टी हिनं ६८ किलो वजनी गटात कास्यपदक पटकावलं होतं. पुरुषांची फ्रीस्टाइल स्पर्धा आजपासून सुरू होणार आहे. भारताचे दोन कुस्तीपटू कास्यपदकासाठी मैदानात उतरणार आहेत.
Site Admin | September 7, 2024 7:05 PM | U20WWC