१९ वर्षाखालच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं अंतिम सामन्यातलं स्थान निश्चित केलं आहे. आज क्वालालंपूर इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं, इंग्लंडवर ९ गडी राखून मात केली.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं २० षटकात ८ गडी गमावून ११३ धावा केल्या. भारतातर्फे परुनिका सिसोदिया, आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी ३, तर आयुषी शुक्लानं २ गडी बाद केले. विजयासाठी ११४ धावांचं लक्ष्य भारतानं १५ षटकातच एका गड्याच्या मोबदल्यात ११७ धावा करत पार केलं.
त्या आधी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियावर मात करत पहिल्यांदाच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताची लढत दक्षिण आफ्रिकेशी होईल.