दुबई इथं झालेल्या १९ वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा ५९ धावांनी पराभव करून बांग्लादेशानं विजेतेपद पटकावलं. विजेतेपदासाठी आज झालेल्या अंतिम सामन्यात बांग्लादेशानं भारतासमोर विजयासाठी १९९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र बांग्लादेशाच्या गोलंदाजीसमोर भारताचा संपूर्ण संघ ३५ षटकं आणि दोन चेंडूत केवळ १३९ धावा करून तंबूत परतला.
भारताच्या वतीनं कर्णधार मोहम्मद आमन यानं सर्वाधिक २६ धावा केल्या. अंतिम सामन्यात भारताचे ३ तर संपूर्ण स्पर्धेत एकूण १० गडी बाद केलेल्या बांग्लादेशाचा गोलंदाज इक्बाल इमन याला सामनावीर तसंच मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवलं गेलं.