भारतातल्या अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावासाने सलग दुसऱ्या वर्षी दहा लाखांहून अधिक स्थलांतरेतर व्हिसा जारी करून एक नवीन विक्रम नोंदवला आहे. अमेरिकनं जारी केलेल्या निवेदनात, गेल्या चार वर्षात भारतातून अमेरिकेत येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत पाच पटीनं वाढ झाल्याचं म्हटलं आहे. या वर्षाच्या पहिल्या अकरा महिन्यात 20 लाखाहून अधिक भारतीयांनी अमेरिकेची वारी केली असल्याचंही दूतावासानं म्हटलं आहे.
Site Admin | December 28, 2024 1:45 PM | U.S. Embassy
भारतातल्या अमेरिकन दूतावासाने दहा लाखांहून अधिक स्थलांतरेतर व्हिसा जारी करुन नोंदवला विक्रम
