महिला क्रिकेटमध्ये एकोणीस वर्षांखालच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला संघाची घोषणा केली आहे. निकी प्रसाद हिच्याकडे कर्णधारपद देण्यात आलं असून सानिका चाळके उपकर्णधार असेल. नुकत्याच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या संघाचं कर्णधारपद देखील निकीकडेच होतं. कमलिनी जी आणि भाविका अहिरे या दोघी यष्टिरक्षक म्हणून असतील. ही स्पर्धा पुढच्या वर्षी १८ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान मलेशियाच्या क्वालालंपूर इथे होणार आहे. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार असून भारत अ गटात आहे. या गटात भारतासह यजमान मलेशिया, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचे संघ असणार आहेत.
Site Admin | December 24, 2024 12:53 PM | U-19 Asia Cup