दुबई इथं सुरू असलेल्या १९ वर्षांखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांग्लादेशानं भारतासमोर विजयासाठी १९९ धावांचं आव्हान ठेवलं आहे.
या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी देखील बांग्लादेशाच्या फलंदाजीला लगाम घालत, त्यांचा संपूर्ण संघ १९८ धावांतच तंबूत धाडला. बांग्लादेशाच्या वतीनं मोहम्मद रिझान यानं सर्वाधिक ४७ धावा केल्या. भारताच्या युद्धजीत, चेतन आणि हार्दिक यांनी प्रत्येक दोन गडी बाद केले.
शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या षटकात बाद धावा झाल्या होत्या.