व्हिएतनाममध्ये झालेल्या यागी वादळामुळं १७९ नागरिक ठार झाले असून हजारो नागरिकांना वाचवण्यात आलं आहे. यागी हे आशिया खंडातलं सर्वात विनाशकारी वादळ ठरलं असून त्यामुळं भूस्खलन होत आहे. या वादळामुळं सोसाट्याच्या वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यांमुळं व्हिएतनाम मधल्या प्रांतातला एक पूलही उध्वस्त झाला आहे.
दरम्यान हनोई मधल्या लाल नदीच्या पुराने गेल्या २० वर्षातली सर्वोच्च पातळी गाठली असून या नदीकाठच्या रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे. यागी वादळामुळं भूस्खलन होत असून लाओ मध्ये काल झालेल्या भूस्खलनामुळं एका खेड्यातले २२ नागरिक ठार झाले आहेत. या वादळामुळं उत्तर थायलंड, लाओस तसंच म्यानमार मध्ये अतिवृष्टी सुरु असून तिथं पूर आले आहेत.