यागी चक्रीवादळ काल व्हिएतनामला धडकून पश्चिम दिशेला गेलं. या वादळामुळे देशात किमान १४ जणांचा मृत्यू झाला असून १७६ जण जखमी झाले आहेत. तसंच ३० लाखांहून अधिक नागरिकांना विजेशिवाय राहावं लागत आहे. वादळ निघून गेलं असलं तरी पूर आणि भूस्खलनाचा धोका अद्याप टळलेला नाही, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. व्हिएतनाम देशातल्या सुमारे ३ हजार ३०० इमारती, एक लाखाहून अधिक हेक्टर जमिनीवरची पिकं, पाच हजार हेक्टरवरच्या फळबागा आणि सुमारे एक हजार ऍक्वाकल्चर पिंजरे उद्ध्वस्त झाले आहेत. या वादळानं चीनच्या हेनन प्रांतातही पूरस्थिती निर्माण झाली आहे. फिलिपिन्समध्येही या वादळानं १६ जणांचा बळी घेतला आहे.
Site Admin | September 8, 2024 8:26 PM | Typhoon Yagi