अमेरिकेत नॅशविल अँटिऑक शाळेत एका १७ वर्षांच्या विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात काल दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये हल्लेखोर विद्यार्थ्याचाही समावेश आहे. शाळेच्या उपाहारगृहात ही गोळीबाराची घटना घडली.
हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात आधी एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.