डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणातील ४ पैकी २ संशयित आरोपी अद्याप फरार

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या दोन आरोपी शिक्षकांकडे ज्या १२ विद्यार्थ्यांची हॉल तिकीट सापडली आहेत, त्यातील काही विद्यार्थ्यांच्या पालकांची लातूर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याच्या आमिषाला बळी पडत विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरोपींसोबत आर्थिक व्यवहार केल्याची माहिती आहे.

 

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणातील चार पैकी दोन संशयित आरोपी अद्याप फरार आहेत. दिल्ली इथल्या गंगाधर नावाच्या संशयितांच्या शोधासाठी लातूर पोलिसांचं एक पथक उत्तराखंडमध्ये डेहराडून इथं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान अटकेत असलेला आरोपी जलीलखान पठाण याला लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी निलंबित केलं आहे. पठाण हा लातूर शहराजवळील कातपुर इथल्या जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक होता. पठाणची विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव दाखल केल्याचं ते म्हणाले.