दोन नक्षलवादी महिलांनी आज गडचिरोली इथं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. अनेक गुन्ह्यांची नोंद असलेल्या या दोघींवर प्रत्येकी ८ लाख रुपयांचं बक्षीस होतं. २०२२ पासून आतापर्यंत १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करावं आणि स्वाभिमानाचं जीवन जगावं , असं आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केलं आहे.
Site Admin | June 27, 2024 6:56 PM | गडचिरोली | नक्षलवादी
दोन नक्षलवादी महिलांचं गडचिरोली इथं पोलिसांसमोर आत्मसमर्पण
