डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 18, 2024 6:18 PM | Bangladesh

printer

बांगलादेशात झालेल्या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

बांगलादेशात टोंगी गाझीपूर इथं दोन समाजगटांमधे झालेल्या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झाला तर १०० हून अधिक जण जखमी झाले. बिस्वा इज्तेमा या धार्मिक कार्यक्रमासाठी मैदान ताब्यात घेण्यावरुन तबलिगी जमात या संघटनेच्या आणि भारतीय धर्मगुरु मौलाना साद कंधलवी यांच्या कार्यकर्त्यांमधे हा झगडा झाला. पोलिसांनी जखमींना विविध रुग्णालयांमधे दाखल केलं आहे. परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून परिस्थिती तणावपूर्ण आहे.  या आधी गेल्या ५ नोव्हेंबरला तबलिगी जमात च्या मौलाना झुबैर अहमद गटाने साद कंधलवी यांच्या बांगलादेश प्रवेशाला विरोध केला होता.   

सर्वाधिक वाचले

सर्व पहा