नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावर नाशिक जिल्ह्यात सिन्नर इथं कार कंटेनरला धडकून झालेल्या अपघातात छत्रपती संभाजीनगर इथल्या बहुजन समाज पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. मुंबईहून बसपाची समिक्षा बैठक आटोपून ते परतत असताना काल पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. सचिन बनसोडे आणि प्रशांत निकाळजे अशी मृतांची नावं आहेत.
Site Admin | December 5, 2024 9:18 AM | अपघात | समृद्धी महामार्ग
समृद्धी महामार्गावर कार आणि कंटेनर अपघातात छत्रपती संभाजीनगर इथल्या दोघांचा मृत्यू
