जम्मू-काश्मीर मधल्या किश्तवाड़ जिल्ह्यात काल दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन भारतीय जवान शहीद झाले. तर दोन जवान जखमी झाले. किश्तवाड जिल्ह्यात छत्रू बेल्ट इथल्या नैडगाम परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाल्यानंतर तिथं शोध मोहिम सुरू करण्यात आली.
या मोहिमे दरम्यान, नैडगाम गावाजवळच्या जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर बेछूट गोळीबार केला. त्यात चार जवान गोळी लागून जखमी झाले. त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेलं. दरम्यान, या परिसरात अजूनही जैश-ए-मोहम्मद संघटनेचे चार दहशतवादी लपले असून त्यांचा शोध घेतला जात आहे.