जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यात काल सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत सहा दहशतवादी ठार झाले तर दोन जवानांना वीरमरण आलं. या दोघांपैकी एक जवान महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातला आहे. कुलगाम मध्ये चिन्नीगाम आणि मोडेरगाम इथं दहशतवादी लपून बसल्याची खबर कळताच सुरक्षा दलांनी तातडीनं कारवाई केली. मोडरगम इथल्या चकमकीत अकोला जिल्ह्यातल्या मोरगाव भाकरे इथल्या प्रवीण प्रभाकर जंजाळ या जवानाला हौतात्म्य आलं. प्रवीण जंजाळ यांचे पार्थिव विमानानं नागपूरला आणण्यात येणार असून त्यानंतर ते त्यांच्या मूळगावी नेलं जाणार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Site Admin | July 7, 2024 7:45 PM | Jammu and Kashmir
जम्मू काश्मीरच्या कुलगाम इथं दहशतवादी चकमकीत दोन जवानांना वीरमरण
