छत्तीसगढमधे बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या आईडी स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. हा स्फोट बिजापूर-भोपाळपट्टनम राष्ट्रीय महामार्गावर मादेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. या स्फोटामुळे रस्त्यावर पाच फूट खोल खड्डा निर्माण झाला असून जखमी जवांनावर मादेडमधल्या आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.