डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दोन जहाल नक्षलवाद्यांचं गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण

वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि शासनानं बक्षीस जाहीर केलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांनी काल गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केलं. रामसू पोयाम आणि रमेश कुंजाम अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत. रामसू पोयामावर चकमक, खून, दरोडा आदी संबंधित १२ गुन्हे दाखल असून त्याच्यावर शासनानं सहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. रमेश कुंजाम २०१९ पासून नक्षली कारवायात सहभागी असून त्याच्यावरही शासनानं दोन लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ६८० नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा