एक राष्ट्र एक निवडणूक या विषयी दोन विधेयकं उद्या लोकसभेत सादर करण्यात येणार आहेत. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल संविधान विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयकदेखील उद्या संसदेत सादर करतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याविषयीच्या विधेयकाला मंजुरी दिली होती. प्रस्तावित संविधान संशोधन विधेयकामधे लोकसभा आणि राज्यसभा निवडणुका एकाच दिवशी करण्यासंबंधी तरतूद असेल.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उच्च स्तरीय समितीनं लोकसभा आणि राज्यसभेसाठी देशात एक राष्ट्र एक निवडणूक हा प्रस्ताव मांडला होता. वन नेशन, वन इलेक्शन विधेयक हे संघराज्यवादाच्या तत्त्वांना तडा देत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फेटाळून लावला आहे. नवी दिल्लीत एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.