डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 10, 2024 7:00 PM

printer

वंचित बहुजन आघाडीच्या अण्णा जाधव यांच्यावर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन आरोपींना अटक

वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा  जाधव यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन आरोपींना रत्नागिरी पोलिसांनी बदलापूरमधून अटक केली असून  गुहागरच्या न्यायालयानं  त्यांना १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दोन दिवस आधी जाधव यांच्यावर  गुहागरमध्ये हल्ला झाला होता. आणखी पाच आरोपींचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचं निष्पन्न झालं असून, त्यांचा कसून शोध सुरू आहे.

 

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा