सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन फरार आरोपींना बीड पोलीस दलाच्या विशेष पथकानं आज सकाळी पुण्यात अटक केली. या दोघांना पुढील तपासासाठी सी आय डी च्या ताब्यात देण्यात येणार आहे, असं पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितलं . या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना फरार घोषित केलं होतं. कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे.