भारत आणि इंग्लंड पुरुष क्रिकेट संघादरम्यान टी-20 सामना मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील आजचा पहिला सामना कोलकाता इथं ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामन्याची सुरुवात होईल. संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. 6 फेब्रूवारी पासून उभय संघादरम्यान तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार आहे.