रस्त्यावर प्रवास करताना नागरिकांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत टनलिंग इंडियाच्या दुसऱ्या परिषदेला संबोधित करत होते. भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सरकार काम करत असल्याचं ते यावेळी म्हणाले. कोणताही प्रकल्प यशस्वी होण्यासाठी तंत्रज्ञान, आर्थिक व्यवहार्यता, कच्च्या मालाची उपलब्धता आणि तयार उत्पादनाचं विपणन यावर भर द्यायला हवा, असं त्यांनी सांगितलं.
Site Admin | September 3, 2024 7:55 PM | Nitin Gadkari | Tunneling India
रस्त्यावर प्रवास करताना नागरिकांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची – मंत्री नितीन गडकरी
