केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा उद्या हरयाणातील पंचकुला इथं देशव्यापी क्षयरोग निर्मूलन मोहिमेची सुरुवात करतील. देशातल्या ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ३४७ जिल्ह्यांमधून राबवली जाणारी ही मोहीम १०० दिवस चालणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी २०१८ मध्ये क्षयरोग निर्मूलन परिषदेत या उपक्रमाची प्रथम घोषणा केली होती. या १०० दिवसांच्या मोहिमेत अधिक प्रमाणात क्षयरोगी असलेल्या वस्तींशी संपर्क वाढवून नवीन रुग्ण शोधणे, गंभीर आजारी क्षयरोग्यांसाठी आधुनिक उपचार, तसंच पोषक आहाराच्या पुरवठ्यावर भर दिला जाईल.
Site Admin | December 6, 2024 3:22 PM | Tuberculosis eradication