युक्रेनसोबत शांतता करार होत नाही तोपर्यंत रशियावर कठोर निर्बंध आणि शुल्क लादण्यात येईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. रशिया युक्रेनवर दडपशाही करत असल्यानं हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं.
ट्रम्प हे मागच्या काही दिवसात रशियाची बाजू घेत होते. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.