अमेरिकेने टॅरिफ लागू करायला ९० दिवसांची स्थगिती दिल्यानंतर झालेल्या घडामोडींचे सकारात्मक परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर झाले. बाजार सुरू झाल्यापासून ते दुपारपर्यंत ही वाढ कायम राहिली आहे. सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पंधराशेहून अधिक अंकांनी वाढून ७५ हजार ३००च्या आसपास व्यवहार करतो आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५०० पेक्षा जास्त अंकांनी वाढून २२ हजार ९००च्या आसपास व्यवहार करतो आहे.