रशिया- युक्रेन युद्धासाठी राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की जबाबदार असून ते अत्यंत कमकुवत नेते असल्याची टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. रशिया-युक्रेन युध्द संपवण्याच्या उद्देशानं वाटाघाटी घडवून आणण्यासाठी सध्या चर्चा सुरु आहे.
या चर्चेतून युक्रेनला वगळण्यात आल्याबद्दल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्सकी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही टीका केली आहे. झेलेन्स्की यांच्या उपस्थितीशिवाय देखील शांतता करार केला जाऊ शकतो, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चुकीच्या माहितीच्या आधारे बोलत असल्याचं वक्तव्य झेलेन्स्की यांनी कीव मधे पत्रकारांशी बोलताना केल्यानंतर दोन्ही नेत्यामधले संबंध ताणले गेले आहेत.