त्रिपुरामधे मुसळधार पावसामुळं गेल्या दोन दिवसांत झालेल्या भूस्खलन आणि महापुराच्या घटनांमधे किमान सात नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. संततधार पावसामुळं तिथलं जनजीवनही विस्कळीत झालं आहे. तिथला अतिसखल भाग पिकांसह पाण्यात बुडाला आहे. हावडा, गोमती, खोवई तसंच मुहुरी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं या नद्यांकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे.
आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी त्रिपुरा राज्य सरकारनं राज्यभरात १८३ निवारा छावण्या उभारल्या असून तिथली जिल्हा प्रशासनं पुरग्रस्त नागरिकांना अहोरात्र मदत पुरवत आहेत.