मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हस्ते आज मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर घरोघरी तिरंगा अभियानाचा प्रारंभ झाला. लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग आणि बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यांच्या त्यागाची आणि बलिदानाची जाणीव तरुणांना व्हावी आणि त्यांच्यात राष्ट्रीयत्वाची भावना रूजावी, यासाठी ‘घरोघरी तिरंगा अभियान’ प्रेरणादायी ठरेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या अभियानात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली. राज्यात विविध ठिकाणी घरोघरी तिरंगा अभियानाला सुरुवात झाली आहे. धुळ्यात यानिमित्त एक बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती, तर वाशिम शहरातही सायकलरॅली काढण्यात आली.
Site Admin | August 9, 2024 8:19 PM | CM Eknath Shinde | HARGHARTIRANGA
हर घर तिरंगा अभियानाला राज्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
