महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथिनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोतिबा फुले यांना आदरांजली वाहणारे संदेश समाजमाध्यमावर लिहीले आहेत.
जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या विचार – कार्यावर आधारित विविध कार्यक्रम विविध संस्था संघटनांतर्फे राज्यात सर्वत्र होत आहेत.