राज्यसभेचं आजचं कामकाज सुरू झाल्यानंतर उत्तर प्रदेशात हाथरस इथं झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांना आदरांजली वाहण्यात आली. या घटनेतील जखमींना वैद्यकीय मदत देण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जात आहेत, या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे, अशी माहिती राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी दिली.
अशा घटना रोखण्यासाठी विशेष कायदा करावा, अशी सूचना राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या निवेदनात केली. त्याआधी सभागृहात माजी दिवंगत सदस्यांनाही आदरांजली वाहण्यात आली.