त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक २०२५ आज लोकसभेत सादर करण्यात आलं. गुजरातमधे आणंद इथं हे विद्यापीठ स्थापन होणार असून सहकारातून समृद्धी हे उद्दिष्ट गाठण्याच्या हेतूने व्यवस्थापकीय आणि तांत्रिक शिक्षण तिथे दिलं जाईल. केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी विधेयक सभागृहात सादर केलं.
लोकसभेत आज वक्फ सुधारणा विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल सादर होणार आहे. जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील या समितीनं पडताळलेल्या पुराव्यांची नोंदही सभागृहासमोर ठेवली जाईल. संयुक्त संसदीय समितीने मसुदा अहवाल आणि सुधारित विधेयक स्वीकारलं असून काही सदस्यांनी असहमतीच्या नोंदी केल्या आहेत.