डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्य शासनाकडून विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य शासनानं काल विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. नवी मुंबईतले सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची, नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली असून, नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची, छत्रपती संभाजीनगर इथं वस्तू आणि सेवा कर विभागाचे सहायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. सध्या या पदावर असलेले मिलिंदकुमार साळवे यांची, छत्रपती संभाजीनगर इथंच अल्पसंख्याक विकास सहआयुक्त या पदावर बदली करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अविनाश पाठक यांची, बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा