केंद्र सरकारकडून राज्यांना काल डिसेंबर २०२४ साठी १ लाख ७३ हजार ३० कोटी रुपयांच्या करांच्या रकमेचं हस्तांतरण करण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्राच्या १० हजार ९३० कोटी ३१ लाख रुपयांचा वाटा आहे. राज्यांना भांडवली खर्चाला गती देता यावी तसंच विकासकामं आणि कल्याणकारी उपक्रमांना वित्त पुरवठा करणं शक्य व्हावं , यासाठी हा निधी जारी करण्यात आला असल्याचं वित्त मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे याबद्दल आभार मानले आहेत. राज्याच्या विकासाला चालना देण्याच्या प्रयत्नांना यामुळं पाठबळ मिळणार असल्याचं फडणवीस यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.