डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 28, 2024 1:14 PM | TRAI

printer

फसवे संदेश आणि कॉल्सचा सामना करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी एकत्रित काम करण्याची गरज – TRAI

अवांछित संदेश आणि फसव्या कॉल्सच्या समस्येचा सामना करण्यासाठी सर्व दूरसंचार कंपन्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असं TRAI अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी म्हटलं आहे. फसवे संदेश आणि दिशाभूल करणाऱ्या फोन कॉल्स पासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी TRAI नं नियमकांच्या संयुक्त समितीची काल नवी दिल्ली इथं बैठक घेतली, त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं.  URLs, APKs, OTT लिंक्स आणि SMS मध्ये ‘कॉल बॅक’ नंबरच्या व्हाइटलिस्टिंग अंमलबजावणी सक्षम करण्याचं आवाहन लाहोटी यांनी केलं आहे. दूरसंचार संसाधनांचा वापर करून होणारी फसवणूक नियंत्रित करण्यासाठी नियमकांमधली माहितीची देवाणघेवाण वाढविण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा