खाजगी रेडीयो प्रसारणाचे धोरणाच्या विविध मुद्द्यांवर संबधितांच्या सूचना आणि हरकती जाणून घेण्यासंदर्भात सरकारने पाऊल उचललं आहे. त्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक मंडळाने आज खाजगी रेडिओ प्रसारकांसाठी डिजिटल रेडिओ प्रसारण धोरण नियमावलीशी संबधित विचारविनिमय टिपण प्रसिद्ध केलं आहे. या विचारविनिमय टिपणावर संबधितांनी त्याच्या सूचना २८ ऑक्टोबरपर्यंत पाठवायच्या आहेत.
आकाशवाणीने अॅनालॉग मध्यम लहरी आणि लघु लहरी प्रसारणाचं डिजिटाझेशन करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. आकाशवाणीने एफ एमवर डिजिटल रेडिओ तंत्रज्ञानाच्या चाचण्या सुरु केल्या आहेत.