नोंदणीकृत नसलेल्या टेलीमार्केटर्स कंपन्यांकडून ग्राहकांना जाणारे जाहिरातीसाठीचे दूरध्वनी त्वरित थांबवावेत अशी सूचना ट्राय अर्थात दूरसंचार नियामक आयोगाने सर्व इंटरनेट सेवा पूरवठादार कंपन्यांना केली आहे. दूरसंचार सेवेचा वाणिज्य उपयोजन कॉलसाठी बेकायदा वापर होत असल्यास असे वापरकर्ते इंटरनेट सेवा पुरवठादारांकडून काळ्या यादीत टाकले जावे अशी सूचना प्रसारण मंत्रालयाने केली आहे. सर्व इंटरनेट सेवापुरवठादारांनी नियमपालन करावं आणि दर महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला त्याचा अहवाल द्यावा असंही ट्रायने म्हटलं आहे. ग्राहकांना त्रास होऊ न होण्याच्या दृष्टीने स्पॅमकॉल्सची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने ट्रायने हा निर्णय घेतल्याचं प्रसारण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
Site Admin | August 13, 2024 6:18 PM | TRAI