रायगड जिल्ह्यातल्या कोलाडजवळच्या पुई इथल्या नवीन पुलाचा गर्डर टाकण्याचं काम सुरू असल्यानं आजपासून 13 जुलै दरम्यान सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या वेळात मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. या काळात पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान वरंध घाटदेखील 31 ऑगस्टपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची अधिसूचना रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढली आहे. 19 जूनला झालेल्या जोरदार पावसानं दरड कोसळून रस्ता खचून वाहतुकीसाठी अत्यंत अरुंद आणि धोकादायक झाला आहे. पुण्याकडे जाण्यासाठी महाड-माणगांव-निजामपूर-ताम्हिणी घाट-मुळशी-पिरंगुट-पुणे असा मार्ग तसंच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळूण-पाटण-कराड-कोल्हापूर असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.
Site Admin | July 11, 2024 9:13 AM | कोलाड | मुंबई - गोवा महामार्ग | रायगड
13 जुलै दरम्यान मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाणार
