कोल्हापूर जिल्ह्यातल्या तिलारी घाटातली अवजड वाहनांची वाहतूक ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पावसामुळे घाटातल्या रस्त्यांचे संरक्षण कठडे जीर्ण झाल्यामुळे अपघाताचा धोका असल्याने सावधानता म्हणून ही वाहतूक बंद करण्यात आली आहे. अवजड वाहनांना आंबोली घाट आणि कर्नाटकातला चोर्ला घाट हे दोन पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.
Site Admin | June 20, 2024 7:34 PM | Heavy Vehicles | Kolhapur | Tilari Ghat
कोल्हापूर : तिलारी घाटात अवजड वाहनांची वाहतूक ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद
