गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. ५ सप्टेंबरला मध्यरात्री १२ वाजल्यापासून ८ सप्टेंबरला रात्री ११ वाजेपर्यंत, ११ सप्टेंबरला रात्री ८ वाजल्यापासून १३ सप्टेंबरला रात्री ११ वाजेपर्यंत तर १७ सप्टेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून १८ सप्टेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत ही बंदी लागू असेल. या कालावधीत अत्यावश्यक वस्तू, खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या बंदीतून सूट मिळेल.
Site Admin | August 24, 2024 4:07 PM | Ganeshotsav | Mumbai-Goa highway
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी
