सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातल्या नेरूर गावातील शेतकरी सूर्यकांत कुंभार यांनी पारंपरिक बियाणांची बँक तयार केली आहे. गेल्यावर्षी पासून सुरू झालेल्या या बँकेत भाताची ३० प्रकारची विविध वाणं, भाजीपाला,फळभाज्या,कडधान्य अशी बियाणे आहेत. या बँकेतून शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीची एक किलो पारंपरिक बियाणं दिली जातात आणि त्याबदल्यात त्यांच्याकडून दोन किलो बियाणं जमा करून घेतली जातात.
Site Admin | July 5, 2024 8:24 PM | Sindhudurg
सिंधुदुर्गमधील कुडाळ तालु्क्यात पारंपरिक बियाणांची बँक
