डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बांगलादेशातल्या राजकीय अस्थिरतेमुळं कांदा निर्यात तात्पुरती बंद ठेवण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय

बांगलादेशातल्या राजकीय अस्थिरतेमुळं महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी कांदा निर्यात तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थिती स्थिर झाल्यानंतरच निर्यात पुन्हा सुरू होईल.

 

बांगलादेशातली कांद्याचा सर्वात जास्त पुरवठा भारतातून होतो. महाराष्ट्रातल्या नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांतून सर्वाधिक कांदा निर्यात होतो. सध्या राजकीय अस्थिरतेमुळे ७० ट्रक सीमेवर अडकले होते. त्यातल्या काहींना परवानगी मिळाल्यानं ते बांगलादेशात पोहोचले आहेत. मात्र, परिस्थिती आटोक्यात आली नाही तर निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेत निर्यात बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा